Menu Close

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना

नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

  • 1.शेतकरी अपघात विमा योजना काय आहे?
  • 2.कोणत्या प्रकारचे अपघात यात समाविष्ट आहेत?
  • 3.सरकारी देय रक्कम किती आहे?
  • 4.कागदपत्रे कोणती लागतात?
  • 5.अनुदान ची संपूर्ण प्रक्रिया कशी आहे?

शेती करताना कोणत्याही कारणाने अपघात होऊन शेतकरी मरण पावतात किंवा काही शेतकरी अपंग होतात. तर अशा शेतकऱ्यांच्या कुटुंबांसाठी महाराष्ट्र शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे.

शेतकरी किंवा त्यांच्या कुटुंबियांना अपघातामुळे आर्थिक मदत करणे हा आहे.

पात्रता

शेतकरी महाराष्ट्रातील रहिवासी असावा.10 ते 75 वर्षे वयोगटातील खातेदार शेतकरी या योजनेसाठी पात्र आहेत.

महाराष्ट्र शासनामार्फत नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कडे सर्व खातेदारांचा विमा हप्ता भरला जातो.

रस्ता / रेल्वे अपघात

पाण्यात बुडून मृत्यू

वीज पडून मृत्यू

विजेचा धक्का बसून झालेला मृत्यू

उंचावरून पडून झालेला मृत्यू

कीटकनाशक हाताळताना अथवा अन्यकारणाने झालेली विषबाधा

दंगल

खूनसर्पदंश / विंचू दंश

जनावराच्या हल्ल्याने किंवा चावल्याने जखमी मृत्यू

बाळंत पणातील मृत्यू

नक्षलाईट कडून झालेल्या हत्या

अन्य कोणत्याही अपघात.

दावा पत्र (प्रस्ताव)

अपघात ग्रस्त शेतकरी नोंद असलेला ७/१२ उतारा

वारस नोंद उतारा ६ क६ ड (फेरफार / गाव नमुना)

पोलिस (एफ.आय.आर) किंवा जवाब पोलिस मरणोत्तर पंचनामाशवविच्छेदन अहवाल आणि पोलिस स्थळ पंचनामा

वारसदाराचे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञा पत्र आणि मृत्यु प्रमाण पत्र

शेतकऱ्यांच्या वयाचा पुरावा

वारसदाराची बँक पासबुक प्रत आणि सातबारा उतारा

अपंगत्व आल्यास अपंगत्वाचे प्रमाणपत्र

अपघाताचे स्वरूप आणि कागदपत्रे

अर्ज कोणाकडे करायचं:

सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित अपघातग्रस्त शेतकरी / शेतकऱ्यांचे वारसदार हे संबंधित तालुका कृषि अधिकारी यांचेकडे सविस्तर प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह विहित नमुन्यातील (क्लेम फॉर्म भाग- १) नुसार अपघात झाल्यापासून ३० दिवसाच्या आत सादर करतील.

योजनेची अंमलबजावणी

प्रस्तावाची प्रत खाली दिली आहे तिथून प्रिंट करून घ्यावी

क्लेम प्रस्ताव भाग 1

Related Posts

Call Now Button