प्रस्तावना
आजच्या रासायनिक शेतीच्या युगात जमिनीची ताकद कमी होत चालली आहे, उत्पादन वाढतं पण त्याचं आरोग्यावर दुष्परिणाम होतो. अशा परिस्थितीत सेंद्रिय शेती म्हणजे शाश्वत शेतीकडे नेणारा प्रकाशाचा किरण आहे. ही शेती निसर्गाशी सुसंवाद साधते आणि जमिनीतला ‘जीव’ टिकवते.
सेंद्रिय शेती म्हणजे काय?

सेंद्रिय शेती ही एक नैसर्गिक शेतीपद्धत आहे जिथे रासायनिक खते, कीटकनाशके किंवा वाढीचे हार्मोन्स न वापरता पूर्णतः नैसर्गिक उपाय वापरले जातात.
वापरात येणारे घटक:
-
- शेणखत, गांडूळ खत
-
- जीवामृत, घनजीवामृत
-
- दशपर्णी अर्क, निंबोळी अर्क
-
- आंतरपीक, आच्छादन, पीकपालट
- जिवाणूज्यान्या सेंद्रिय खाते

सेंद्रिय शेतीचे मुख्य फायदे:
-
- जमिनीची सुपीकता टिकवते
-
- उत्पादन खर्च कमी होतो
-
- अन्न सुरक्षित आणि आरोग्यदायी राहतं
-
- जमिनीतील जिवाणूंचं जीवन टिकतं
-
- हवामान बदलांसाठी शेती सक्षम होते
-
- कीड व रोग याला सक्षम होते
-
- एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा वापर करणे
जीवामृत – जमिनीचा टॉनिक!
जीवामृत तयार करण्याची कृती (१० लिटर):
-
- गोमूत्र – ५ लिटर
-
- गायीचे ताजं शेण – १०० ग्रॅम
-
- गूळ – १०० ग्रॅम
-
- बेसन – १०० ग्रॅम
-
- स्थानिक माती – १ मुठ
-
- पाणी – १० लिटर

सर्व साहित्य एकत्र करून ४ -५ दिवस झाकून ठेवा. दररोज ढवळा.
वापर: ठिबक किंवा फवारणीद्वारे एका एकर साठी पुरेसे.
नैसर्गिक कीड नियंत्रण उपाय :-
कीड/रोग | उपाय |
---|---|
अळी, माशी | दशपर्णी अर्क , निंबोळी अर्क,लसुण अर्क |
बुरशीजन्य रोग | ट्रायकोडर्मा |
बीजप्रक्रिया | बियाण्यांची बीजप्रक्रिया (गोमूत्रात) |
गांडूळ खत – शेतीसाठी नैसर्गिक वरदान
-
- गांडूळ खत हे जमिनीच्या पोताला सुधारतं
-
- पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते
-
- उत्पादनात वाढ होते आणि खर्च कमी होतो
-
- माती मधील जिवाणू याची सख्या वाढते
-
- जमिनीची सुपीकता सुधारते .
-
- पिकाच्या उत्पादनात वाढ होते
तुलना: रासायनिक शेती वि. सेंद्रिय शेती
उत्पादन | तात्पुरते जास्त | दीर्घकालीन टिकाऊ |
खर्च | खतं, औषधं महाग | नैसर्गिक उपाय स्वस्त |
जमिनीची अवस्था | थकलेली, नापीक | सुपीक, जिवंत |
आरोग्यावर परिणाम | आरोग्यासाठी दुष्परिणाम | आरोग्यदायी अन्न |
सेंद्रिय शेतीची सुरुवात – ५ सोप्या पायऱ्या
-
- १० गुंठ्यांपासून सुरू करा
-
- जीवामृत व गांडूळ खत तयार करा
-
- नैसर्गिक कीड नियंत्रण वापरा
-
- सेंद्रिय सर्टिफिकेशनबद्दल माहिती मिळवा
-
- थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्केटिंग करा
-
- सेंद्रिय शेती बद्दल लोकान परियंत माहिती पोहचवा
-
- १० गुंठ्यांपासून सुरू करा
“जमिनीत हात घातला की फक्त माती लागत नाही,
आपल्या पिढ्यांची आशा, श्रम, आणि स्वप्नं लाभतात.
सेंद्रिय शेती म्हणजे निसर्गाशी मैत्री,
शाश्वततेकडे जाणारं आपल्या कृषी संस्कृतीचं खरं पाऊल.
चला तर मग, मातीतलं सोनं उगमाला आणूया –
निसर्गाच्या साथीनं नव्या कृषिक्रांतीची सुरुवात करूया!”
ही माहिती तालुका कृषी कार्यालय, करमाळा यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली आहे.
आपण सेंद्रिय शेती संदर्भात अधिक माहिती, प्रशिक्षण किंवा मार्गदर्शन हवे असल्यास आपल्या नजिकच्या कृषी सहाय्यकांशी संपर्क साधा.