Menu Close

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना

नमस्कार शेतकरी बंधूंनो आज आपण भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना काय आहे, किती अनुदान भेटते, कोणत्या पिकांना भेटते, निवड प्रक्रिया कशी असते, कुठे अर्ज करायचा, अर्जाची अंतिम तारीख काय, कसा अर्ज करायचा, निवड झाल्यावर पुढची काय प्रक्रिया असते अशा सर्व गोष्टी ईथे पाहणार आहोत. त्यासाठी लेख शेवट पर्यंत वाचा, आवडल्यास गरजू लोकाना, मित्राना पाठवा. चला तर मग सुरू करूया योजना.

कोणती फळ पिकांना योजना लागू

  1. सिताफळ
  2. संत्री
  3. मोसंबी
  4. फणस
  5. पेरू
  6. नारळ
  7. डाळिंब
  8. जांभूळ
  9. चिंच
  10. चिकू
  11. कोकम
  12. काजू
  13. कागद लिंबू
  14. आवळा
  15. आंबा
  16. अंजीर
  • 7/12,
  • 8A
  • आधार कार्ड
  • बँक पासबुक
  • हमीपत्र संयुक्त खातेदार असल्यास सर्व खातेदारांची सम्मतिपत्र लागेल
  • अनुसूचित जाती जमातीसाठी त्यांचे जात प्रमाणपत्र

सर्व शेतकरी, नौकरदर जे महात्मा गांधी रोजगार हमी फळबाग लागवड योजना मध्ये लाभ घेऊ शकत नाहीत असे सर्वांसाठी ही योजना आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकरी कोकण विभागात कमीतकमी 10 गुंठे व जास्तीत जास्त 10 हेक्टर, व इतर विभागात कमीतकमी 20 गुंठे व जास्तीत जास्त 6 हेक्टर क्षेत्र मर्यादित लाभ घेऊ शकतो.

अर्ज कुठे करावा

Mahadbtmahait.gov.in या लिंक वर क्लिक करून करता येईल.

अनुदान हे 3 टप्प्यात मिळते:

  • पाहिल्या वर्षी ५०% दुसऱ्या वर्षी ३०% आणि तिसऱ्या वर्षी २०% असे एकूण १००% अनुदान देणारी योजना आहे.
  • त्यासाठी तुम्हाला तुमच्या बागेतील तिसऱ्या वर्षी पर्यंत 9०% झाडे जिवंत ठेवावी लागतात.

भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना: निवड प्रक्रिया कशी असते:

लाभार्थी ने अर्ज केल्यापासून महिनाभरात त्याची महाराष्ट्र शासनाच्या mahadbt वरील लकी ड्रॉ मध्ये त्याची निवड झाल्याचा मेसेज लाभार्थी च्या मोबाईल वर येतो.

निवड झाल्यापासून त्याने 7 दिवसाच्या आत कागदपत्रे mahadbt वर अपलोड करणे : ( 7/12, 8A, हमीपत्र, आधार, बैंक pasbook, इत्यादी)

नंतर लाभार्थी ने त्याला जेवढ्या एकरावर लागवड करायची आहे त्याचे estimate त्याच्या गावातील कृषि सहायक यांच्याकडे देने.

नंतर कृषि सहायक ते पूर्व संमती साठी कृषी विभाग कडे पाठवतात. ( जो पर्यंत पूर्व संमती मिळत नाही तोपर्यंत लाभार्थी ने लागवड करायची नसते) हे ज्यांना नवीन लागवड करायची आहे त्या साठी योजना आहे.

पूर्व संमती मिळाली की लाभार्थी शासनाच्या नियमानुसार लागवड करू शकतात.

लागवड केल्यानंतर लाभार्थीला रोपांची अणि खत पावती ( बील अपलोड) करण्यास सांगितले जाते.

नंतर लाभार्थी चे त्याच्या फळपीकासोबत कृषि सहायक geo taging करून पुढील सर्व प्रोसेस करतात.

टीप:रोपे हे शासन मान्य नर्सरी मधूनच घ्यावी लागतात. बिलावर उपविभागीय कृषी अधिकारी (SDO )असा शिक्का असावा

अधिक माहितीसाठी तुमच्या गावातील कृषी सहायक यांना संपर्क करणे..

सौजन्य: तालुका कृषी अधिकारी कार्यालय करमाळा

Related Posts

Call Now Button