
आज दि. 12 जून रोजी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.श्री कुमार आशिर्वाद यांनी कंदर गावातील पालखी सोहळा सुरळीत पार पडावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी गावाची पाहणी केली. यावेळी पाणीपुरवठा, राहण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह व आरोग्य सुविधा यासह विविध तयारीचा आढावा घेण्यात आला.” ज्या सुविधा उपलब्ध नाहीत त्या तत्काळ उपलब्ध करून द्या असे सांगण्यात आले.यावेळी उपस्थित जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, प्रांत अधिकारी माळी साहेब तहसीलदार शिल्पा ठोकडे गटविकास अधिकारी कदम साहेब, पद्म पंडित प्रतिष्ठानचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब पवार तसेच कंदर गावचे प्रथम नागरिक सरपंच मौलासाहेब मुलांनी उपसरपंच सचिन शिंदे ग्राम महसूल अधिकारी ढोकणे साहेब सहाय्यक कृषी अधिकारी महाडिक साहेब ग्रामविकास अधिकारी कळसाईत साहेब आदी उपस्थित होते.

कंदरतील पालखी सोहळ्याचे वैशिष्ट्य कंदरमध्ये निवृत्ती महाराज यांची पालखी येते तेव्हा कीर्तन, अभंग आणि भक्तिमूलक कार्यक्रम आयोजित होतात.येथे तामेबंद परिवाराच्या घोड्यांना विशेष आदर दिला जातो आणि त्यांनीही काही वर्षांपासून सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग घेतला आहे .भक्तांनी टाळ–मृदंग, भक्तिपूर्ण घोष यामुळे गावात भक्तिमय वातावरण निर्माण होते. जवळपास 25000-30000 वारकरी येथे एक दोन दिवस मुक्कामी असतात.
सोमवार, 7 जुलै 2025 रोजी सर्व दिंड्या ( तुकाराम महाराज पालखी, ज्ञानेश्वर महाराज पालखी या पंढरपूर येथे आषाढी एकादशी साठी एकत्र येतात आणि या दिवशी महाराष्ट्राचे मुखमंत्री आणि त्यांच्या सोबत रांगेत जे जोडपे प्रथम असते त्यांच्या हस्ते विठ्ठलाची पूजा केली जाते.
