Menu Close

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पांगरे येथे वृक्षारोपण

पांगरे: आज दिनांक 5 जून 2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 2025 वर्षाचे थीम प्लास्टिक निर्मूलन संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले त्याचप्रमाणे वृक्षारोपण हे करण्यात आले.

पांगरे येथे मोहगमी वृक्ष लावून वृक्षारोपण करण्यात आले.

पांगरे येथे मोहगमी वृक्ष लावून वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच विकसित कृषी भारत अभियान यात्रे संदर्भात विविध विषयांवर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी डॉ.तानाजी वळकुंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले डॉ.स्वाती कदम यांनी ऊस पिक लागवड व पाचट व्यवस्थापन, सौ पिंकी रायगड यांनी डाळिंब व्यवस्थापन वर मार्गदर्शन केले श्री विशाल वैरागर यांनी कार्यक्रमाचे रूपरेषा शेतकऱ्यांना समजावून सांगितले.

डॉ.स्वाती कदम यांनी ऊस पिक लागवड व पाचट व्यवस्थापन यावर मार्गदर्शन देताना.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री तुषार अहिरे, सोनू कोळी तसेच तालुका कृषी अधिकारी श्री काशिनाथ राऊत, कृषी पेर्वेक्षक श्री राजेंद्र खाडे, कृषी सहाय्यक श्रीमती वर्षा निकत, सरपंच श्रीमती विजया सोनवणे, उपसरपंच श्री महेश टेकाळे, प्रतिष्ठित व्यक्ती, सचिन पिसाळ,विवेक पाटील, महेश शेळके, भैरवनाथ हराळे,बाळासाहेब गुटाळ, अरुण शेंडगे, धनंजय गायकवाड, बाबासाहेब तोबरे, संभाजी टेकाळे श्री अजयकुमार बागल तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कृषी विज्ञान केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Related Posts

Call Now Button