
कंदर: आज दिनांक 5 जून 2025 रोजी जागतिक पर्यावरण दिनानिमित्त 2025 वर्षाचे थीम प्लास्टिक निर्मूलन संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे वृक्षारोपण हे करण्यात आले. या कार्यक्रम प्रसंगी कंदर गावचे सरपंच श्री मौलासाहेब गुल मोहम्मद मुलानी यांनी कंदर गावातील लोकांना “दोन झाडे लावल्यास घरपट्टी माफ व वर्षभर पीठ मोफत दळून देण्याचे” आवाहन आजच्या दिवशी केले आहे.
श्री मौलासाहेब मुलानी सरपंच व श्री निलेश शिंदे उपसरपंच यांच्या हस्ते जिल्हा परिषद शाळा कंदर येथे आंब्याचे वृक्ष लावून वृक्षारोपण करण्यात आले.

तसेच विकसित कृषी भारत अभियान यात्रे संदर्भात विविध विषयांवर शेतकरी बांधवांना मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी डॉ.तानाजी वळकुंडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले डॉ.स्वाती कदम यांनी ऊस पिक लागवड व पाचट व्यवस्थापन, सौ पिंकी रायगड यांनी डाळिंब व्यवस्थापन वर मार्गदर्शन केले श्री विशाल वैरागर यांनी कार्यक्रमाचे रूपरेषा शेतकऱ्यांना समजावून सांगितले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुका कृषी अधिकारी श्री काशिनाथ राऊत सर, उप कृषी अधिकारी राजेंद्र खाडे सर, सहायक कृषी अधिकारी श्री राजाभाऊ महाडिक, श्री अजयकुमार बागल तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच कृषी विज्ञान केंद्राचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.तसेच कंदर गावामधील ब्रह्मदेव अर्किले, नानासाहेब लोकरे, नितीन जाधव, संदीप सरडे, अमोल माने, अलुद्दीन काझी, विठ्ठल कवडे, तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.
