
करमाळा तालुक्याची खरीप हंगाम पूर्वतयारी बैठक उत्साही वातावरणात संपन्न झाली.
आज दिनांक ५ मे २०२५ रोजी करमाळा तालुक्यात खरीप हंगामपूर्व तयारीसाठी शेतकरी कार्यशाळा सुप्रीम मंगल कार्यालय, कुंभेज फाटा येथे पार पडली.
कार्यक्रमाचे आयोजन तालुका कृषी अधिकारी श्री देवराव चव्हाण,करमाळा यांच्या वतीने करण्यात आले होते.
या कार्यशाळेचे अध्यक्षस्थान मा. श्री. संजय वाकडे, उपविभागीय कृषी अधिकारी, कुर्डुवाडी (ता. माढा) तथा नोडल अधिकारी, खरीफ हंगाम बैठक पूर्व तयारी यांनी भूषवले.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उमाकांत जाधव यांनी केले तसेच सौ रोहिणी सरडे यांनी शेतीशाळा कशी करावी याबद्दल सविस्तर माहिती दिली, त्यानंतर कृषी पर्यवेक्षक तळेकर साहेब यांनी केळी पिकाबद्दल माहिती दिली जसे लागवड कधी करावी. तसेच केळी पिकाचे पाणी, रोग, खते व्यवस्थापन यावर मार्गदर्शन केले.




तसेच लिंबू लागवड आणि हस्त बहार यावर दादासाहेब नवले साहेब यांनी मार्गदर्शन केले तसेच खाडे साहेब यांनी तूर लागवड यावर मार्गदर्शन केले तसेच साडे मधील शेतकरी यांनी सुधा सेंद्रिय शेती, जीवामृत कसे बनवावे त्याचे फायदे काय यावर छान मार्गदर्शन केले. तद्नंतर पाणी फाऊंडेशन चे आशिष धाड यांनी सुद्धा गट शेती बद्दल सविस्तर माहिती दिली तसेच त्यांनी एक चित्रफितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये गट शेतीमुळे झालेले आमूलाग्र बद्दल कसे झाले हे दाखवून दिले.

तसेच कार्यक्रमासाठी कृषि संशोधन केंद्र शेलगाव चे प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर नवले उपस्थित होते त्यांनीही सेंद्रिय शेती वर माहिती दिली. आणि सर्वात शेवटी कृषिसहायक दत्ता वानखेडे यांनी कृषी पायाभूत निधी यावर सखोल असे मार्गदर्काशान केले.

कार्यक्रमात खरीप हंगामातील पीक नियोजन, बीजप्रक्रिया, माती परीक्षण, खत व्यवस्थापन , कीड व रोग नियंत्रण, सिंचन व्यवस्था,शेतीशाळा , तण व्यवस्थापण, सुधारित बियाणे वापर, हवामान अनुकूल तंत्रज्ञान यासारख्या विविध महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमांचे सूत्र संचालन श्री उमाकांत जाधव यांनी केले आणि आभार श्री दत्तात्रय गायकवाड यांनी मानले.
कार्यशाळेस मंडळ कृषी अधिकारी, सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक तसेच बी.टी.एम. व ए.टी.एम. तालुक्यातील शेतकरी बांधव आणि भगिनी यांचाही सक्रिय सहभाग होता.


अशा प्रकारे आजचा कार्यक्रम अगदी खेळीमेळीत संपन्न झाला
सौजन्य : कृषी विभाग करमाळा
********* धन्यवाद********