Menu Close

ठिबक सिंचन अनुदान संपूर्ण माहिती

  1. नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या लेखामध्ये आपण ठिबक सिंचन अनुदान याबद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत यामध्ये लाभार्थ्याची पात्रता काय असते, कागदपत्र कोणते लागतात, किती खर्च येतो, अनुदान किती मिळते अशी संपूर्ण प्रक्रिया यामध्ये आपण पाहणार आहोत.

उद्देश

  • १.सिंचनाखालील लागवडीयोग्य क्षेत्र वाढवणे 
  • २.उपलब्ध पाण्याची कार्यक्षमता वाढवणे 
  • ३.पिकांच्या उत्पादनात अणि शेतकर्‍यांच्या उत्पन्नात वाढ करणे. 
  • सर्व खातेधारक शेतकरी 

अट : यापुर्वी त्याच क्षेत्रावर मागील 7 वर्षात लाभ घेतलेला नसावा लाभार्थी ने. 

आवश्यक कागदपत्रे

  • १) 7/12, 
  • २) 8A
  • ३) संवर्ग प्रमाणपत्र ( अनु.जाती, अनु.जमाती साठी)
  • ४) उताऱ्यावर सिंचन साधन नोंद जसे विहीर, बोर, जलाशय अश्याप्रकारे नोंद असावी. 
  • ५) उताऱ्यावर पाण्याचा स्रोत ऊपलब्ध नसल्यास पाण्याचा स्रोत ऊपलब्ध प्रमाणपत्र जोडावे. 
  • ६) संयुक्त (सामायिक) खातेदार असल्यास त्याचे प्रमाणपत्र जोडावे. 

   चार्ट 

अल्प व अत्यल्प भूधारक शेतकर्‍यांना खर्च मर्यादेच्या 80% व इतर शेतकर्‍यांना खर्च मर्यादेच्या 75% अनुदान देय आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून 55% / 45% व उर्वरित पूरक अनुदान मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना 25% / 30% देय आहे

निवड प्रक्रिया ते payment ला जाईपर्यंतची प्रक्रिया कशी असते:

शेतकर्‍यांनी mahadbt वर अर्ज करायचा असतो

नंतर त्याची निवड होते ( निवड झाल्यापासून 7 दिवसाच्या आत त्याने कागदपत्रे mahadbt वर अपलोड करायचे असतात अन्यथा त्याचा अर्ज रद्द होतो.

नंतर त्याने अपलोड केलेल्या कागदपत्रांची छाननी होते अणि सर्व बरोबर असल्यास ते पूर्व सम्मति साठी पाठवले जाते.

शेतकर्‍यांना पूर्व सम्मति भेटल्यास त्याला बिल अपलोड ( upload invoice) अश्या प्रकारचा msg येतो त्या वेळी लाभार्थी यांनी ज्या दुकानातून ज्या कंपनीचे ड्रिप घेतली आहे त्या ड्रिप चे बील अपलोड करावे लागते.

लाभार्थी यांनी ड्रिप खरेदी करताना बिला मधील Bach नंबर अणि cml नंबर हा ड्रीप वरील Bach नंबर अणि cml नंबर सारखाच आहे का हे खात्री करून घेणे ( जर दोन्ही मध्ये फरक असेल तर अनुदान मिळत नाही)

बील अपलोड केल्यानंतर लाभार्थी याचे ड्रिप कृषि विभाग कडून चेक होते सर्व बरोबर आढळून आल्यास ते payment साठी पाठवले जाते.

ऑनलाइन अर्ज प्रक्रिया वर्षभर चालू असते..

अधिक माहितीसाठी:  तालुका कृषी अधिकारी, मंडल कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक,कृषि सहायक यांच्याशी संपर्क करावा.

******* धन्यवाद 🙏🙏🙏*****

Related Posts

Call Now Button